सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साधकांना आलेल्या अनुभूती !

‘११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव सोहळा फर्मागुडी (गोवा) येथे होणार होता. आम्हाला देवगड (सिंधुदुर्ग) येथून त्या सोहळ्यासाठी जायचे होते. तेथे आम्हाला गुरुमाऊलींचे प्रत्यक्ष दर्शन होणार होते. त्यामुळे आम्ही आनंदात होतो. ‘गुरुदेवच आपल्याला शक्ती देणार आहेत’, असा विचार आमच्या मनात आला आणि आम्ही गोव्याला जाण्याचा निर्णय घेतला.

१. कार्यक्रमस्थळी पोचल्यावर रथोत्सव चालू होण्यापूर्वीच आमची भावजागृती होऊ लागली.

२. आम्हाला लांबूनच दिव्य रथाचे दर्शन झाले. त्या वेळी आमच्या देहात आनंदाच्या लहरी निर्माण होऊ लागल्या.

३. जेव्हा साधक गुरुदेवांचा रथ ओढत होते, तेव्हा ‘रथ ओढणार्‍या त्या साधकांमध्ये आपणही आहोत’, असे आम्हाला वाटले.

श्री. अनंत राजाराम परुळेकर

४. जसाजसा रथ आमच्या जवळ येत होता, तसतशी आमची भावावस्था वाढत होती. आमचा नामजप एका लयीत होत होता.

५. ‘रामराज्य असेच होते आणि येणारे ईश्वरी राज्यही असेच असेल’, असे आम्हाला वाटले.

६. घरून निघाल्यापासून कार्यक्रम संपून घरी जाईपर्यंत आम्हाला १५ घंटे बसावे लागले, तरीही आम्हाला कोणताही त्रास झाला नाही.

सौ. स्मिता विजय पवार

७. आम्ही घरी जाण्यासाठी वाहनात बसल्यावर आम्हाला पुष्कळ सुगंध येत होता.

८. आम्हाला आमचे हात आणि चेहरा यांवर पुष्कळ सोनेरी अन् चंदेरी दैवी कण दिसले.

‘गुरुदेवा, ‘आम्हाला दर्शन देऊन तुम्हीच कृतकृत्य केले’, त्याबद्दल आपल्या चरणी कृतज्ञता !’

– श्री. अनंत राजाराम परुळेकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ७१ वर्षे) आणि सौ. स्मिता विजय पवार, देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. (३०.५.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक