‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या निवासाची खोली आणि त्याच्या बाजूची खोली यांच्या संदर्भात काही प्रयोग करून घेण्यात आले होते. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. खोलीत प्रवेश करतांना
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या निवासाच्या खोलीच्या बाजूच्या खोलीत प्रवेश करतांना ‘मी स्थुलातील लोकाकडून सूक्ष्म लोकाकडे जात आहे’, असे मला जाणवले. तेव्हा माझ्या मनाची स्थिती आणखी सूक्ष्म होऊन मला त्या खोलीतील चैतन्य जाणवू लागले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या निवासाच्या खोलीत प्रवेश करतांना माझ्या मनाला आनंद जाणवत होता.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघर
परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीतील देवघरातील देवतांची चित्रे आणि मूर्ती यांच्या भोवती मला सूक्ष्मातून विविध रंगांची वलये दिसत होती. ‘मूर्तींपासून किती दूर अंतरापर्यंत ही वलये पसरलेली आहेत ?’, हे माझ्या लक्षात आले नाही. देवघरातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे माझे लक्ष सर्वाधिक केंद्रित होत होते.
३. परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांच्या खोलीतील देवघराविषयी सांगितलेले वैशिष्ट्यपूर्ण सूत्र
देवघरातील देवतांच्या मूर्तींच्या भोवती सूक्ष्मातून विविध रंगांची वलये दिसतात; कारण देवता सगुण आहेत. प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राच्या भोवती रंगीत वलय दिसत नाही; कारण ते निर्गुणाशी संबंधित आहेत.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
|