आपल्या जीवनात भगवंताची इच्छा काम करते, हे ध्यानात रहाण्यासाठी मनात त्यांच्या अस्तित्वाची जाणीव सदैव जागृत रहावी लागते. ती जाणीव मनामध्ये वास करते आणि चिंतनानेच ती जागी रहाते. म्हणून भगवंताचे चिंतन करत गेले, तर त्यांच्या अस्तित्वाची जाणीव जागी रहाते; पण भगवंताचे चिंतन सतत होण्यास त्यांच्या नामासारखा अन्य उपाय नाही. म्हणून आपल्या व्यवहाराला नामस्मरणाची जोड दिली, तर कर्म आपोआप कृष्णार्पण होते. ‘भगवंत माझ्याजवळ आहे. अगदी माझ्या हृदयात आहे, अशी खात्री वाटते’, हा नामस्मरणाचा अर्थ आहे. कोणतेही कर्म करतांना नामाचे अनुसंधान टिकवणे, हीच अकर्तेपणाने कर्म करण्याची मोठी युक्ती आहे.
– पू. (प्रा.) के.वि. बेलसरे (‘पू. (प्रा.) के.वि. बेलसरे यांचे आध्यात्मिक साहित्य’ या फेसबुकवरून साभार)