१. शिबिराला जायला मिळण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर सहसा न मिळणारी सुटी आस्थापनाच्या मालकांनी सहजपणे देणे
जुलै २०२३ मध्ये रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात शिबिर होते. त्यासाठी माझी निवड झाल्याचे कळल्यावर मला पुष्कळ आनंद झाला. त्यानंतर मला काळजी वाटू लागली की, माझ्या आस्थापनाचे मालक मला १० ते १२ दिवसांची सुटी मुळीच देणार नाहीत. नंतर मी मनातल्या मनात गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) प्रार्थना केली, ‘गुरुदेवा, मला शिबिराला यायचे आहे; परंतु मला कार्यालयातून एवढ्या दिवसांची सुटी मिळणार नाही. आपणच सर्वकाही करून घ्यावे.’ त्यानंतर मी माझ्या आस्थापनाच्या मालकांना म्हटले, ‘‘मला एका शिबिरासाठी गोव्याला जायचे आहे. मला दूरचा प्रवास करायचा आहे; म्हणून मला १२ दिवसांची सुटी मिळू शकते का ? ’’ मालकांनी मला शिबिराविषयी माहिती विचारली. तेव्हा मी त्यांना सनातन संस्थेचे कार्य सांगितले. ते ऐकून मालक म्हणाले, ‘‘तुमच्या कामाचे नियोजन करून तुम्ही जाऊ शकता.’’ तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला.
२. मी शिबिराला जाऊन आल्यावर माझ्या आस्थापनाच्या मालकांनी मला आनंदी होऊन विचारले, ‘‘तुमचे शिबिर कसे झाले ?’’ तेव्हा मी त्यांना म्हटले, ‘‘अत्यंत चांगले झाले.’’
३. शिबिराला गेल्यामुळे सुटीचा १२ दिवसाचा पगार कापला जाणे आणि त्याविषयी नकारात्मक विचार न येता ‘गुरुदेवच सर्वकाही सांभाळून घेतील’, असा विचार येणे
त्यानंतर मला पगार मिळाला. त्यात माझा १२ दिवसांचा पगार कापला होता. माझ्या यजमानांचे कामही सध्या तेवढे चांगले चालू नव्हते आणि माझा पगारही अल्प आला होता; परंतु मी विचार केला ‘गुरुदेवच हा मास सांभाळून घेणार आहेत.’ माझे पती म्हणाले, ‘‘तू गोव्याला गेली नसतीस, तर तुला संपूर्ण पगार मिळाला असता.’’ ते ऐकूनही माझ्या मनात कोणतेच नकारात्मक विचार आले नाहीत.
४. साधिका गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवेसाठी गेल्यामुळे तिच्या मालकांनी तिच्या अधिकोशातील खात्यात तिच्या नकळत १० सहस्र रुपये भरणे आणि हे पाहून साधिकेची भावजागृती होणे
९.८.२०२३ या दिवशी माझ्या अधिकोशाच्या खात्यात कुणीतरी १० सहस्र रुपये भरले होते. मला वाटले, ‘माझे यजमान किंवा माझे सासरे यांनी ते पैसे भरले असतील’; परंतु माझ्या घरातील सदस्यांकडून कुणाचाही पैशासंदर्भात मला भ्रमणभाष आला नव्हता. नंतर मी विचार केला, ‘माझ्या खात्यात कुणी पैसे भरले असतील ?’ त्यासाठी मी माझ्या खात्याची नोंद काढून पाहिली. तेव्हा मला तेथे माझ्या आस्थापनाच्या मालकाचे नाव दिसले. नंतर मी माझ्या मालकांना सांगितले, ‘‘आपण चुकून माझ्या खात्यात १० सहस्र रुपये भरले आहेत.’’ तेव्हा माझे मालक म्हणाले, ‘‘मी चुकून पैसे भरले नाहीत. तुम्ही गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवेसाठी गेला होता ना, त्यासाठी मी तुमच्या खात्यात ते पैसे भरले आहेत.’’ हे ऐकून माझ्या डोळ्यांत भावाश्रू आले.
५. कृतज्ञता
माझ्या मनात विचार आला, ‘गुरुदेव आम्हाला किती सांभाळत आहेत ! प्रत्येक क्षणी मनात केवळ गुरुदेवांचेच स्मरण करायला पाहिजे.’ अशा महान गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. नीलम यादव, गोकुळपुरा, आग्रा. (४.९.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |