वास्तूदोष निवारणार्थ केलेल्या रत्नसंस्कार विधीच्या संदर्भातील संशोधन !

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘एका साधकाकडे १९.८.२०२३ या दिवशी वास्तूदोष निवारणार्थ रत्नसंस्कार विधी करण्यात आला. या विधीचे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या उपकरणाद्वारे संशोधन करण्यात आले. या उपकरणाद्वारे वस्तू, वास्तू आणि व्यक्ती यांच्यातील नकारात्मक अन् सकारात्मक ऊर्जा मीटरमध्ये मोजता येते. रत्न संस्कार विधी केल्याने वास्तूवर सकारात्मक परिणाम होतात, हे या संशोधनातून सिद्ध झाले. या संशोधनाच्या अंतर्गत केलेल्या चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन पुढे दिले आहे.

यू.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

१. आध्यात्मिक स्तरावरील उपाय (टीप) केल्याने रत्नांवरील त्रासदायक स्पंदनांचे आवरण नाहीसे होऊन रत्नांतील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ वाढ होणे

सौ. मधुरा कर्वे

कलियुगातील वातावरण रज-तमप्रधान असल्याने रत्नांवर त्रासदायक स्पंदनांचे आवरण असते. त्यामुळे रत्नांवर आध्यात्मिक  उपाय करून त्यांची शुद्धी करून मगच त्यांचा उपयोग विधीत करावा.

टीप : चाचणीतील रत्नांना सात्त्विक उदबत्तीचा धूर दाखवणे, त्यांवर विभूती फुंकरणे, संतांची भजने लावणे (रत्नांजवळ संतांच्या स्वरातील भजने लावल्याने रत्ने संतांच्या चैतन्याने भारित होतात.) इत्यादी आध्यात्मिक स्तरावरील उपाय केले.

२. रत्न संस्कार विधी केल्यावर भूमीतील नकारात्मक स्पंदने नाहीशी होऊन भूमीत पुष्कळ सात्त्विकता निर्माण होणे 

श्री. धनंजय कर्वे

रत्न संस्कार विधी करण्यापूर्वी घरातील प्रत्येक दिशेकडील भूमीची निरीक्षणे करण्यात आली. तेव्हा भूमीत सकारात्मक स्पंदने काहीच नसून पुष्कळ नकारात्मक स्पंदने आढळून आली. रत्न संस्कार विधी केल्यानंतर मात्र भूमीतील नकारात्मक स्पंदने नाहीशी होऊन भूमीत पुष्कळ सात्त्विकता निर्माण झाली. रत्न संस्कार केलेल्या प्रत्येक दिशेची निरीक्षणे पुढील सारणीत दिली आहेत.

३. रत्नसंस्कार विधीमुळे घरातील नकारात्मक स्पंदने नाहीशी होऊन घरामध्ये पुष्कळ सात्त्विकता निर्माण होणे

‘रत्नसंस्कार विधीचा घरावर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी विधीपूर्वी आणि विधीनंतर घराची छायाचित्रे काढून त्यांची निरीक्षणे करण्यात आली. या निरीक्षणांतून लक्षात आले की, विधीपूर्वी घरात सकारात्मक ऊर्जा काहीच नसून ७४१.५० मीटर नकारात्मक ऊर्जा होती. विधीनंतर मात्र घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन घरात ३६१.५० मीटर एवढी सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. थोडक्यात ज्या उद्देशाने घरात रत्न संस्कार विधी करण्यात आला, तो सफल झाला. हे संशोधन श्रीगुरूंच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने यशस्वी झाले, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. धनंजय कर्वे, वास्तू अभ्यासक, फोंडा, गोवा आणि सौ. मधुरा कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२०.८.२०२३)

इ-मेल : [email protected]

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.