हिंदु महिलांची ‘इफ्तार !’

‘छत्रपती संभाजीनगर येथे हाजी कासिम मशिदीत सर्वधर्मीय महिलांनी प्रथमच ‘इफ्तार’ मेजवानी केली !’, अशी बातमी वाचनात आली. इथे लक्षात घेतले पाहिजे की, ‘सर्वधर्मीय’ म्हणजे केवळ मुसलमान आणि हिंदु ! जिथे मुसलमान स्त्रियांना मशिदीत जाण्याची अनुमती नाही, तिथे हिंदु स्त्रियांना अनुमती कशी मिळते ? हिंदु स्त्रियांना मुसलमान धर्माकडे आकर्षित करण्याचा हा नवीन मार्ग आता शोधला गेला आहे, हे हिंदु महिला कधी लक्षात घेणार ? सर्वधर्मभावाचे हे एकतर्फी धडे हिंदू किती दिवस गिरवत रहाणार ? स्वधर्माविषयी यत्किंचितही अभिमान नसल्यामुळे हिंदु महिलांनी मशिदीत जाऊन ‘इफ्तार’ मेजवानीचे गुणगान केले. धर्मशिक्षण न देणारे आणि न घेणारे हिंदूच याला उत्तरदायी आहेत. हिंदु महिलांना धर्मांध मशिदीत घेऊन जात आहेत, यातून ते कोणता संदेश देत आहेत, हे लक्षात घेऊन आता तरी हिंदू जागरूक होतील का ? मशिदीत काय भयानक कृत्ये चालतात, याची सूची या हिंदु महिलांना कुणी तरी दिली पाहिजे. जरी प्रत्येक मशिदीत असे होत नसले, तरी एक प्रकारे हिंदूंच्या जिवावर उठलेल्या मशिदींमध्ये जाऊन या महिलांनी त्याचे गुणगान करणे, ही हिंदूंची सपशेल हार आहे !

आज देशभरात ‘लव्ह जिहाद’ने उच्छाद मांडला आहे. धर्मांध हिंदु मुलींना फसवून हिंदूंचा वंशविच्छेद करत आहेत, याविषयी जराही संवेदनशीलता नसेल, तर हे हिंदूंचेच अपयश आहे. मशिदीमध्ये मेजवानीसाठी गेलेल्या या महिलांनी त्यांच्या मनोगतात ‘तिथे गेल्यावर चांगले वाटले’, अशा विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्या महिलांना मशिदीत गेल्यावर चांगले वाटले, त्या महिलांना विचारावेसे वाटते की, एवढ्या श्रद्धेने कधी मंदिरात पाऊल टाकले होते का ? मंदिरातील देवता, त्यांचे तत्त्व, मंदिरांची रचना यांचा अभ्यास केला होता का ? महाराष्ट्रातील जाऊ दे आजूबाजूच्या परिसरातील तरी सर्व मंदिरे पाहिली तरी आहेत का ? ‘ज्या मशिदींविषयी एवढा जिव्हाळा वाटत आहे, त्या मशिदींची निर्मिती कशी झाली ?’, हे वेगळे सांगायला हवे का ? भारतातील मशिदींच्या निर्मितीचा इतिहास या हिंदु महिलांनी जाणून घेतला, तर त्या अशा प्रकारे मशिदीत जाऊन तिचे गुणगान करण्यास धजावतील का ? धर्मांधांनी हिंदूंवर केलेल्या आक्रमणांचा इतिहास आणि वर्तमान याची भयावह वास्तवता या महिलांना कुणी सांगेल का ? मुसलमान हिंदूंच्या सणांमध्ये अशा पद्धतीने सहभागी होतात का ? उद्या मुसलमान महिला हिंदूंच्या मंदिरांमध्ये नमस्कार करण्यासाठी येतील का ? आणि जर असे कुणी केले, तर त्या व्यक्तीचे काय होईल ? हे सूज्ञ जाणतात. अयोध्येत श्री रामलल्लाच्या (रामाचे बालक रूप) मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतरही विविध भागांतून निघालेल्या मिरवणुकींवर झालेली आक्रमणे, मंदिर परत मिळवण्याची भाषा, ‘जय श्रीराम’ असे म्हणणार्‍या व्यक्तींवर होणारी प्राणघातक आक्रमणे आपण लगेच विसरतो का ?

– सौ. स्नेहा रूपेश ताम्हनकर, रत्नागिरी