चीनच्या दौर्यावरून परतलेल्या नेपाळच्या उपपंतप्रधानांचे विधान
(‘सार्क’ – दक्षिण आशियाई देशांची जुनी संघटना)
(‘बिमस्टेक’चा – दक्षिण आशियाई देशांची नवीन संघटना)
काठमांडू (नेपाळ) – चीनमधून परतलेले नेपाळचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री नारायण काझी श्रेष्ठ यांनी ‘सार्क’ (दक्षिण आशियाई देशांची जुनी संघटना) संघटनेच्या जागी ‘बिमस्टेक’चा (दक्षिण आशियाई देशांची नवीन संघटना) नेपाळ स्वीकार करणार नाही, असे म्हटले आहे. भारत पाकिस्तानच्या कारवाया पहाता ‘सार्क’ऐवजी ‘बिमस्टेक’ला चालना देण्यावर भर देत आहे. पाकिस्तान हा बिमस्टेकचा सदस्य नाही. या पार्श्वभूमीवर नेपाळच्या उपपंतप्रधानांनी हे वक्तव्य केले आहे. नेपाळ हा सार्क आणि बिमस्टेक या दोन्ही संघटनांचा सदस्य आहे. बिमस्टेक कार्यरत असल्याने भारताच्या कठोर भूमिकेमुळे वर्ष २०१६ पासून ‘सार्क’ची बैठक झालेली नाही. यामुळे नेपाळचे परराष्ट्रमंत्री नाराज आहेत; कारण नेपाळ अजूनही सार्कचा अध्यक्ष आहे. सार्कचे सचिवालय काठमांडू येथे आहे, तर बिमस्टेकचे मुख्यालय बांगलादेशाची राजधानी ढाका येथे आहे.
बिमस्टेकच्या संदर्भात नेपाळी संसदेत आणलेल्या प्रस्तावावर श्रेष्ठ म्हणाले की, सार्क निष्क्रीय आणि कुचकामी झाले आहे. बिमस्टेक हा सार्कला पर्याय म्हणून आम्ही पहात नाही. सार्कला पुन्हा सक्रीय करण्यासाठी नेपाळ निश्चितपणे पावले उचलेल.