रामनाथी आश्रम पहातांना खानापूर, बेळगाव येथील कु. आदिती होणगेकर हिला आलेल्या अनुभूती !

१. प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र नसून प्रत्यक्ष ‘ते तिथे बसले आहेत’, असे वाटणे

कु. आदिती होणगेकर

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाच्या स्वागतकक्षातील प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र पहातांना असे वाटले की, ते एक छायाचित्र नसून साक्षात् प.पू. बाबा तेथे बसले आहेत. त्यांच्या छायाचित्रात सजीवता जाणवली. त्यांच्या छायाचित्राकडे कोणत्याही दिशेने पाहिल्यावर ‘ते माझ्याकडे बघून हसत आहेत’, असे जाणवले.

२. श्रीकृष्णाचे चित्रही सजीव वाटणे

स्वागतकक्षातील श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहिल्यावर ‘ते चित्रही सजीवच आहे’, असे वाटून श्रीकृष्णाच्या डोळ्यांत सजीवता जाणवली, तसेच ‘सुदर्शनचक्र फिरल्यासारखे वाटले आणि श्रीकृष्ण माझ्याकडेच पहात आहे’, असे जाणवले.

३. एका संतांशी बोलत असतांना स्वतःचे हात आणि हातांची बोटे गुलाबी रंगाची दिसणे

एका संतांचा सत्संग लाभल्यावर सत्संगात ते इतरांशी बोलत असतांना माझे हात आणि हातांची बोटे गुलाबी रंगाची दिसत होती. मी माझ्या शेजारी बसलेल्या साधिकेचा हात बघितला; पण तिचा हात गुलाबी रंगाचा दिसत नव्हता. मला माझाच हात गुलाबी रंगाचा वाटला.’

– कु. आदिती होणगेकर (वय १७ वर्षे), खानापूर, जिल्हा बेळगाव, कर्नाटक.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक