कुंकू लावण्यामागचे शास्त्र समजून घेतले पाहिजे ! – ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे

ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे

मुंबई – हल्लीच्या स्त्रिया कपाळाला कुंकू लावत नाहीत. कुंकू ही गोष्ट पूर्वी झाडापासून निर्माण केली जायची. आता टिकली लावली जाते. कुंकू लावणे, हा एक योगाचा प्रकार आहे. कुंकू नेहमी कपाळाला लावले जाते. कारण तिथे कुंडलिनी शक्ती जागृत असते. आपल्या मेंदूच्या मध्यभागेची नस तिथे जोडलेली असते. प्रतिदिन त्या भागावर मसाज केला गेला, तर संवेदना होऊन तुमचा मेंदू सतर्क होतो. हे त्याच्यामागचे शास्त्र आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी आणि अभिनेत्री नयना आपटे यांनी केले.

त्या पुढे म्हणाल्या की, हे शास्त्र कुणाला पटत नाही किंवा त्याविषयी प्रश्नही विचारले जात नाहीत. ते शास्त्र नीट समजून सांगता येत नाही. त्यामुळे ‘त्यात काय मोठे ?’ या भूमिकेतून कुंकू लावले जात नाही.

संपादकीय भूमिका

  • सनातन संस्था कुंकू लावण्यामागचे धर्मशास्त्र, तसेच कुंकू लावण्यामागील सूक्ष्मातील प्रक्रिया सूक्ष्म-चित्राच्या साहाय्याने गेली अनेक वर्षे विविध माध्यमांतून समजावून सांगत आहे. कुंकू लावण्यामुळे स्त्रियांमधील देवीतत्त्व आणि टिळा लावल्यामुळे पुरुषांमधील शिवतत्त्व जागृत होते. कुंकू लावल्यामुळे ईश्वराचे चैतन्य मिळते, तसेच दोन भुवयांच्या मध्यभागी असलेल्या आज्ञाचक्राचे संरक्षण होते !