उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लोकसभेसाठी १६ उमेदवारांची नावे घोषित !

मुंबई – लोकसभेच्या निवडणुकीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून १६ उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. यामध्ये बुलढाणा – प्रा. नरेंद्र खेडेकर, यवतमाळ/वाशिम – संजय देशमुख, मावळ – संजोग वाघेरे-पाटील, सांगली – चंद्रहार पाटील, हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर, संभाजीनगर – चंद्रकांत खैरे, धाराशिव – ओमराजे निंबाळकर, शिर्डी – भाऊसाहेब वाघचौरे, नाशिक – राजाभाऊ वाजे, रायगड – अनंत गीते, सिंधुदुर्ग/रत्नागिरी – विनायक राऊत, ठाणे – राजन विचारे, मुंबई -ईशान्य – संजय दिना पाटील, मुंबई-दक्षिण – अरविंद सावंत, मुंबई – वायव्य – अमोल कीर्तीकर आणि परभणी येथून संजय जाधव यांनी या उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. यासह अनिल देसाई यांना मुंबई -दक्षिण-मध्य म्हणून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे छत्रपती संभाजीनगर येथील निवडणूक लढवण्यास इच्छुक होते; मात्र त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही.

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मुंबईमध्ये काँग्रेसला उमेदवारी न मिळाल्यामुळे अप्रसन्नता व्यक्त केली आहे. मुंबईतील जागांविषयी महाविकास आघाडीमध्ये अद्याप निर्णय व्हायचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.