चीनचा अरुणाचल प्रदेशवर पुन्हा दावा !

बीजिंग (चीन) – चीनने पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेश त्याचा भाग असल्याचा दावा केला. भारतानेही पुन्हा चीनचा हा दावा फेटाळू लावला आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्या सिंगापूर दौर्‍यावर नुकत्याच केलेल्या वक्तव्यामुळे चीनने अरुणाचल प्रदेशवर पुन्हा दावा केला.

१. अरुणाचल प्रदेशविषयी एका प्रश्‍नावर उत्तर देतांना डॉ. जयशंकर म्हणाले होते की, हे काही नवीन सूत्र नाही. चीनने दावा केला आहे आणि तो पुढे नेला आहे. हे दावे आरंभी बिनबुडाचे आणि निरर्थक आहेत. मला वाटते की, आम्ही यावर अगदी स्पष्ट आहोत आणि आमची एकसमान भूमिका आहे.

२. यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी म्हटले की, भारत आणि चीन यांच्यात सीमाप्रश्‍नावर कधीही एकमत झाले नाही. वर्ष १९८७ मध्ये भारताने बेकायदेशीरपणे कह्यात घेतलेल्या प्रदेशावर ‘तथाकथित अरुणाचल प्रदेश’ सिद्ध केला.

संपादकीय भूमिका

  • भारताने अनेकदा स्पष्ट करूनही अरुणाचल प्रदेशवर वारंवार दावा सांगणार्‍या  चीनला भारताने त्याला समजेल अशा भाषेतच समज द्यायला हवी, हेही तितकेच खरे आहे !