दंड भरून अनधिकृत नळजोडणी नियमित करण्याच्या सूचना
सातारा, २४ मार्च (वार्ता.) – सातारा नगरपालिकेच्या वतीने विशेष तपासणी मोहीम हाती घेऊन २६५ अनधिकृत नळजोडण्या उजेडात आणल्या आहेत. या नळधारकांना सातारा नगरपालिकेने दंडात्मक कारवाईची नोटीस पाठवली असून दंड भरून नळजोडणी नियमित न करणार्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी चेतावणी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.
उन्हाळा चालू झाला की, सातारावासियांना पाणीटंचाईसमवेतच पाणी कपातीलाही सामोरे जावे लागते. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. दैनंदिन पाणीपुरवठ्यात कोणताही पालट न करता नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्या होत्या. त्यामुळे ‘नेमक पाणी मुरते कुठे ?’ याचा शोध घेण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने अनधिकृत नळजोडणी विशेष मोहीम हाती घेण्यात आली. या शोधमोहिमेत २६५ अनधिकृत नळजोडण्या उजेडात आल्या.
संपादकीय भूमिकानोटीस देण्यासमवेत अनधिकृत नळधारक का निर्माण होतात ? हेही शोधणे आवश्यक ! |