कर्नाटकातील प्रसिद्ध बप्पनाडू दुर्गापरमेश्वरी मंदिराची जत्रा
मंगळुरू (कर्नाटक) – दक्षिण कन्नड जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री बप्पनाडू दुर्गापरमेश्वरी मंदिराच्या जत्रेत अन्य धर्मियांना व्यापार करण्याची अनुमती देऊ नये, असे निवेदन जत्रा व्यापारी संघाचे जय शेट्टीगार यांनी मंदिर व्यवस्थापनाला दिले आहे. मंदिराच्या १५० मीटर क्षेत्रात अन्य धर्मीय व्यापार्यांना संधी देऊ नये आणि मंदिराच्या आवारात हिंदूंनीच व्यापार करावा, असे यात निवेदन म्हटले आहे. गेल्या वर्षीय जत्रेच्या वेळी अशाच प्रकारची मागणी हिंदू व्यापार्यांनी केली होती; मात्र त्या वेळी ती मान्य करण्यात आली नव्हती. आताही ही मागणी मान्य होण्याची शक्यता नसल्याचे चित्र आहे. (अन्य धर्मीय व्यापारी फुले, प्रसाद यांची विक्री करत असतील, तर त्यासाठी किती पावित्र्य जपले गेले आहे ?, याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे ! – संपादक)
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या धार्मिक ठिकाणी अन्य धर्मीय व्यापार करण्यासाठी का येतात ? मुसलमानांच्या मशीद आणि दर्गे येथून हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका जात असतांना त्यांवर आक्रमणे होतात, अशा घटना नेहमीच घडत असतात. हे पहाता हिंदूंच्या धार्मिक स्थळी केवळ हिंदूच व्यापारी असले पाहिजेत ! |