मुंबई – कुख्यात गुंड प्रसाद पुजारीला मध्यरात्री १२ वाजता मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबई पोलिसांनी कह्यात घेतले. चीन सरकारने त्याच्या प्रत्यार्पणाला संमती दिली होती. २० वर्षांनंतर तो पोलिसांना सापडला आहे. त्याच्यावर मुंबईत अनेक खून आणि खंडणी यांचे गुन्हे नोंद आहेत. वर्ष २०२० मध्ये त्याच्यावर शेवटचा गुन्हा नोंद झाला होता. शहर गुन्हे शाखेने त्याच्या संपूर्ण टोळीला ठार केले आहे.
मार्च २००८ मध्ये प्रसाद पुजारीने चीनमध्ये तात्पुरते वास्तव्य केले होते. तेव्हापासून तो चीनमध्येच होता.
Notorious criminal #PrasadPujari in Police custody after 20 years.
If it takes the Police 20 years to catch a criminal, one wonders how long it would take to apprehend #terrorists#MumbaiPolice #Mafia
Video courtesy : @WIONews pic.twitter.com/L78P6dJALZ— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 23, 2024
संपादकीय भूमिकागुंडाला पकडण्यासाठी पोलिसांना २० वर्षे लागत असतील, तर आतंकवाद्यांना पकडण्यासाठी किती वर्षे लागतील, याचा विचारच न केलेला बरा ! |