(म्हणे) ‘पुरणपो‍ळी होळीत न टाकता ती गरिबांना दान करा !’

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे आवाहन !

पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) – नागरिकांनी पर्यावरणपूरक होळी साजरी करावी आणि पुरणपो‍ळी होळीत न टाकता तिचे दान गरिबांना करावे, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

गेल्या २५ वर्षांपासून देहूरोड, बिजलीनगर, चिंचवड या भागांत होळीला नैवेद्य म्हणून वहाण्यात येणारी पुरणपोळी आणि नारळ यांचे संकलन करून देहूरोडमधीलच गरीब वस्तीत वाटपाचे काम ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात येते. शहरातील इतर भागांतील नागरिकांनी त्याचे अनुकरण करावे, असे आवाहनही अंनिसने पत्रकाद्वारे केले आहे.

संपादकीय भूमिका 

हिंदु सणांच्याच दिवशी अशी शास्त्रविरोधी आवाहने का केली जातात ?
बकरी ईदच्या दिवशी ‘बकरी न कापता दान करा’, असे आवाहन अंनिस कधी का करत नाही ?
मोठ्या कार्यक्रमांतून प्रतिदिन सहस्रो टन अन्न वाया जात असतांना या संघटना ‘होळीच्या दिवशी पोळी दान करा’, असे म्हणतात. यातून हिंदूंच्या प्रथा-परंपरा मोडीत काढण्याचा अंनिसचा छुपा हेतू उघड होतो. त्यामुळे हिंदूंनी अशा धर्मविरोधी आवाहनांकडे, अंनिसच्या भूलथापांकडे दुर्लक्ष करून होळी सण शास्त्रानुसार साजरा करावा !