आपण होऊ राष्ट्रवीर।

कोलगाव, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग  येथील साधक श्री. दत्तात्रय पटवर्धन  (वय ७० वर्षे ) यांनी भारतमातेचे केलेले गुणवर्णन  आणि आपले तिच्याप्रती असलेले कर्तव्य यांविषयी त्यांना सुचलेले काव्य येथे देत आहोत.

भारताचे काय करावे आम्ही गुणवर्णन।

श्री. द.र. पटवर्धन

मती होते कुंठित; म्हणूनी करतो हे वंदन।। १।।

भारताचा इतिहास आहे खरोखर तेजस्वी।
धैर्य , शौर्य  अन् वीरता पूर्ण, शब्दातीत आणि मनस्वी।। २।।

धर्मवीर, क्रांतीवीर, कर्मवीर, स्वातंत्र्यवीर।
आणिक मानाचा तुरा, भारत झाला चांद्रवीर।। ३।।

घेऊन प्रेरणा या सर्वांकडून आपण होऊ राष्ट्रवीर।
नको केवळ कृतीशून्य गप्पा घरात, होऊनी मोबाईलवीर।। ४।।

– श्री. दत्तात्रय पटवर्धन (वय ७० वर्षे), कोलगाव, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग . (२४.८.२०२३)