कपाळावर घालण्यात आले ३ टाके !
कोलकाता (बंगाल) – बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या संस्थापिका-अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना १४ मार्चला संध्याकाळी घरातच कुणीतरी मागून ढकलल्यामुळे त्या खाली पडल्या. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या कपाळावर आणि नाकाला दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांच्या कपाळावर ३ टाके घालण्यात आले आहेत. डॉक्टरांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना रुग्णालयात भरती करण्याचा सल्ला दिला होता, जेणेकरून त्यांची काळजी घेता येईल; मात्र त्या घरी गेल्या, अशी माहिती येथील एस्.एस्.के.एम्. रुग्णालयाचे संचालक मोनिमोय बंदोपाध्याय यांनी दिली. ममता बॅनर्जी यांना लवकरात लवकर बरे वाटण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
पोलीस घटनेची चौकशी करणार
कोलकाताचे लालबाजार पोलीस ठाण्याचे पोलीस मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दुखापतीच्या घटनेची चौकशी करणार आहेत. ममता बॅनर्जी यांच्या शयनकक्षामध्ये प्रवेश केलेल्यांची चौकशी करण्यात येणार आहे.