भारताला आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त करून घेण्यासाठी शस्त्रसज्ज होणे आवश्यक !

१. आज दुष्ट राष्ट्रे शस्त्रसंपन्न असून सज्जन राष्ट्र असलेल्या भारताकडे शस्त्रसाठा नसणे

‘शस्त्रसुद्धा दुष्ट माणसाच्या हातात असता कामा नये. ते सज्जन माणसाच्याच हातात असले पाहिजे; कारण सज्जन माणूस शस्त्राचा दुरुपयोग करणार नाही. त्याचा उपयोग तो योग्य वेळीच करील; परंतु दुर्दैवाने आज सगळी शस्त्रे दुष्टांच्या हातात आहेत. जगातील सगळी दुष्ट राष्ट्रे शस्त्रसंपन्न आहेत. भारतासारखे सज्जन राष्ट्र शस्त्रविरहित आहे. जेवढी शस्त्रे आपणाकडे असायला हवीत, तेवढी नाहीत.

२. वर्ष १९०० मध्येच स्वामी विवेकानंद यांनी भारताने अणुबाँब बाळगण्याची आवश्यकता निर्देशित केलेली असणे

स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंदांसारखे संन्यासी ‘भगिनी निवेदिता’ यांना वर्ष १९०० मध्ये सांगतात, ‘‘भारताला आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवायचा असेल, तर अणुबाँब बनवावा लागेल.’’ ‘My Master as I Saw Him’ या पुस्तकात भगिनी निवेदिता सांगतात, ‘स्वामी विवेकानंद नेहमी मला सांगत, ‘आपण बलशाली आणि शस्त्रसज्ज झाले पाहिजे.’

३. समर्थांनी समाजाला शस्त्रसज्ज दैवतांची उपासना शिकवणे

समर्थ रामदासस्वामी

समर्थांनी लोकांपुढे ठेवलेली दैवते शस्त्रसज्ज आहेतच; पण एवढे करून ते थांबले नाहीत, तर हाती शस्त्र न धरलेल्या दैवतांना खडसावण्यासही समर्थ कचरलेले नाहीत.’

(साभार : ‘श्री समर्थ रामदासस्वामींची राष्ट्र-धर्म आणि शिकवण’, पृष्ठ क्र. ३३)