|
कोलकाता (बंगाल) – बंगालमधील उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील करंदीघी उपविभागातील अल्तापूर गावात ८ मार्च या दिवशी भाजप बूथ अध्यक्ष राजकुमार दास यांच्या पत्नीवर आक्रमण करण्यात आले. ‘भाजप पश्चिम बंगाल’ या ‘एक्स’ खात्यावरून या विषयीचा व्हिडिओ प्रसारित केला आहे.
१. या महिलेने या व्हिडिओमध्ये म्हटले, ‘माझ्या घरी ३०० ते ४०० मुसलमानांचा जमाव आला होता. मी खिडकीतून त्या लोकांशी बोलत होत आणि माझ्या कुटुंबियांना एकटे सोडण्याची विनंती करत होते; पण त्यांनी आमचे ऐकले नाही. त्यांनी आमच्या घराचा दरवाजा तोडला. मग त्यांनी आमच्या घरातील कपाटे, दूरचित्रवाणी संच, पलंग आणि भांडी यांची तोडफोड केली. आक्रमण करणार्यांनी आमच्या घरात ठेवलेल्या श्री दुर्गादेवी आणि देवी मानसा यांच्या मूर्तीही फोडल्या. याखेरीज माझ्या मुलावर आक्रमण करून त्याचा पाय मोडला, तर मुलीच्या हाताचा अस्थिभंग (फ्रॅक्चर) झाला. माझ्यावरही वीट फेकून मारण्यात आली. माझे कपडे फाडले. आक्रमण करणारे सर्व जण मुसलमान होते. माझ्या पतीने निवडणूक लढवल्यापासून आम्हाला धमक्या दिल्या जात होत्या. माझे पती मुसलमानांंच्या भीतीने लपून बसले होते; पण तो जवळपास न दिसल्याने मला लक्ष्य करण्यात आले.’
२. या घटनेविषयी भाजपच्या खासदार लॉकेट चॅटर्जी यांनी पोस्ट करून म्हटले की, बंगालमध्ये संदेशखालीपासून करंदीघीपर्यंत हिंदूंवर अत्याचार चालूच आहेत. मुख्यमंत्री सातत्याने हिंदूंना दोष देत आहेत. बंगालमधील रहिवासी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
Persecution of Hindus continues unabated in West Bengal, from Sandeshkhali to Karandighi. The Chief Minister consistently shifts blame onto Hindus.
West Bengal residents await justice. #NoVoteToMamata https://t.co/52fhPJoaDy
— Locket Chatterjee (Modi Ka Parivar) (@me_locket) March 10, 2024
३. भाजपचे आमदार डॉ. अशोक कुमार लाहिरी यांनी या महिलेची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांनी दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी माझी मागणी केली आहे.
संपादकीय भूमिकातृणमूल काँग्रेसच्या राज्यात बंगाल म्हणजे दुसरे बांगलादेश झाल्याचेच ही घटना दर्शक ! |