सिद्धपेट (तेलंगाणा) येथे महाशिवरात्रीच्या दिवशी कोमुरावेल्ली मंदिराबाहेर भाविकांवर पोलिसांचा लाठीमार !

भाजपची टीका !

सिद्धपेट (तेलंगाणा) – येथे महाशिवरात्रीच्या दिवशी कोमुरावेल्ली मंदिरात भाविक जलाभिषेकासाठी पोचले असता पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. यामुळे येथे तणाव निर्माण झाला. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.

सौजन्य Nitin Indian Insights

१. मंदिरात पारंपरिक पूजा झाल्यानंतर भाविकांची मोठी गर्दी झाली आणि त्यांनी येथे लावण्यात आलेले लोखंडी अडथळे ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना थांबवण्यासाठी त्यांच्यावर लाठीमार केला. यात अनेक भाविक घयाळ झाले. या वर भाजपने टीका केली आहे. यासह सामाजिक माध्यमांद्वारेही राज्यातील काँग्रेस सरकारवर टीका केली जात आहे.

२. भाजपचे तेलंगाणा राज्याचे कोषाध्यक्ष शांतीकुमार यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी सरकारचे हिंदूंवर अत्याचार करत आहे. पोलिसांनी महिला भाविकांनाही सोडले नाही. हे हिंदूंच्या मूलभूत अधिकारांवरचे आक्रमण आहे. रेवंत रेड्डी, राज्यातील हिंदूंना अशी अमानुष वागणूक का ?

संपादकीय भूमिका 

  • काँग्रेसच्या राज्यात हिंदूंना मारच खावा लागतो, हे पुन्हा एकदा सिद्ध होते !
  • रस्ता अडवून नमाजपठण करणार्‍यांना पोलिसांनी मारल्यावर आकाश-पाताळ एक करणारे काँग्रेसवाले, पुरो(अधो)गामी आता एक शब्दही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !