मंदिरात पूजा करत असतांना बाहेर मुसलमानांनी दिल्या ‘अल्लाहू अकबर’च्या (अल्ला महान आहेच्या) घोषणा !
जयपूर (राजस्थान) – येथील हवामहल मतदारसंघातील भाजपचे आमदार आचार्य बालमुकुंद यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शहरातील आदर्शनगरामध्ये गेली ३१ वर्षांपासून बंद असलेले शिवमंदिर उघडून तेथे पूजा केली. हा भाग मुसलमानबहुल असून येथे काँग्रेसचे रफीक खान हे आमदार आहेत. मंदिर बंद ठेवल्यावरून आमदार बालमुकुंद यांनी आमदार खान यांच्यावर टीका केली. आमदार बालमुकुंद पूजा करत असतांना बाहेर मोठ्या संख्येने मुसलमान गोळा झाले आणि त्यांनी ‘अल्लाहू अकबर’ अशी घोषणाबाजी केली.
सौजन्य : विके न्यूज
आमदार आचार्य बालमुकुंद मंदिराच्या ठिकाणी पोचले असता त्यांना मंदिराच्या प्रवेशद्वाराला कुलुप लावलेले दिसले. त्याची किल्ली न सापडल्याने ते कुलुप त्यांनी तोडले. त्यानंतर ते मंदिराच्या आतमध्ये गेले असता तेथे त्यांना प्रचंड अस्वच्छता दिसली. त्यांनी त्यांच्या समर्थकांसह स्वच्छता केली आणि नंतर पूजा केली. आमदार आचार्य बालमुकुंद म्हणाले की, पूर्वी मंदिराभोवती हिंदूंची मोठी लोकसंख्या होती. नंतर हिंदु विविध कारणांमुळे तेथून निघून गेले.
BJP MLAs reopened the Shiv Mandir which was closed for 31 years in a Mu$|!m-majority area of #Jaipur (Rajasthan).
While performing Pooja in the temple, the Mu$|!m$ outside passed 'Allahu Akbar' (#Allah is great) slogans.
👉 Why should a temple remain closed in the Mu$|!m… pic.twitter.com/TNYLXirTDC
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 10, 2024
परिसरातील मुसलमानांचे म्हणणे आहे की, महाशिवरात्रीच्या दिवशी शुक्रवार असतांना आमदार बालकुमुंद यांनी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. (याला म्हणतात चोरांच्या उलट्या बोंबा ! – संपादक)
संपादकीय भूमिकामुसलमानबहुल भागातील मंदिर बंद का करावे लागते ? हिंदुबहुल भागातील मशिदी आणि चर्च कधी बंद केले जातात का ? सर्वधर्मसमभावाचा ठेका केवळ हिंदूंनीच घेतला आहे का ? |