सत्संगाचे महत्त्व

चाणक्य

सत्सङ्गात् भवति हि साधुता खलानां साधूनां न हि खलसङ्गमात् खलत्वम् ।
आमोदं कुसुमभवं मृदेव धत्ते मृद्गन्धं न हि कुसुमानि धारयन्ति ।।

– चाणक्यनीती, अध्याय १२, श्लोक ७

अर्थ : सत्संगामुळे दुर्जनही सज्जन होतात. दुर्जनांच्या संगतीने सज्जन बिघडत नाहीत. भूमीवर फुले ठेवली असता ती भूमी फुलांच्या सुवासाने सुगंधित होते; पण त्या मातीचा गंध फुलांना येत नाही.’

(संदर्भ : चाणक्यनीती)