तस्करी प्रकरणातील आर्थिक व्यवहार हवालाद्वारे झाल्याची माहिती !
पुणे – येथील अमली पदार्थांच्या तस्करीच्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ११ जणांना अटक केली आहे. या प्रकरणात पंजाब, देहलीपासून इंग्लंडपर्यंत धागेदोरे पोलिसांना मिळाले आहेत. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आता या प्रकरणाकडे लक्ष दिले आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार संदीप धुने असल्याचे अन्वेषणातून पुढे आले आहे. या प्रकरणी संदीप धुने याची प्रेयसी सोनम पंडित आणि संदीप धुने याच्या आणखी एका मैत्रिणीचा सहभाग मिळाला आहे. या तरुणीच्या साहाय्याने आर्थिक व्यवहार होत होते. एम्.डी. तस्करी प्रकरणातील आर्थिक व्यवहार हवालाद्वारे झाल्याची माहिती पुणे पोलिसांनी केलेल्या अन्वेषणातून समोर आली आहे. या कारवाईमागील सूत्रधार संदीप धुनेसह अन्य काही जण पसार आहेत.
धुने याच्याकडे असलेले पैसे या दोघी तरुणी हवालाद्वारे पाठवत असल्याचा संशय पोलिसांना आहे. पुण्यात सिद्ध होणार्या अमली पदार्थ प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे पोलिसांच्या अन्वेषणातून समोर आले आहे. हे अमली पदार्थ पंजाबमधून इंग्लंडमध्ये जात होते.