Bhandara Cattle Death : भंडारा येथील गोशाळेत चारा-पाण्याविना ३० जनावरांचा मृत्यू !

  • गुन्हा नोंद !

  • गोशाळेचे संचालक कह्यात !

भंडारा – जिल्ह्यातील पवनी येथील गोशाळेत चारा-पाण्याविना ३० जनावरांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पवनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गडचिरोली येथील कुरखेडा पोलिसांनी पशूवधगृहात नेणार्‍या जनावरांना कह्यात घेऊन धानोरी येथील बळीराम गोशाळेत २ दिवसांपूर्वी पाठवले होते; मात्र तेथे चारा-पाण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे ६ मार्च या दिवशी ३० जनावरे मृत पावली. या प्रकरणी पवनी पोलिसांनी गोशाळेच्या एका संचालकाला कह्यात घेतले आहे.

गोशाळेत जनावरांना ठेवण्यासाठी शेड (निवारा), पाणी आणि चारा यांची व्यवस्था करणे आवश्यक असतांना गोशाळेकडे स्वतःच्या मालकीचे शेड नव्हते. मागील वर्षी या गोशाळेच्या अध्यक्षांसह १३ संचालकांवर गोशाळेतील जनावरे विक्री केल्याप्रकरणी गुन्हे नोंदवून त्यांना अटक करण्यात आली होती.

संपादकीय भूमिका

जनावरांची निगा राखणे, हे गोशाळेच्या संचालकांचे कर्तव्य असतांना त्याकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे ! जनावरांच्या मृत्यूशी संबंधित सर्वांना आजन्म कारावासाची शिक्षा केली पाहिजे.