श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळमाऊली, तू या विश्वाची ।

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

गे माय माऊली (टीप), तू साधकांची ।
गे माता लक्ष्मी, तू या विश्वाची ।। धृ. ।।

सौ. तेजा म्हार्दाेळकर

किती गे करसी, किती गे फिरसी ।
ना मात्र जाणीव त्याची या जगतासी ।
स्वप्नांत येऊनी दृष्टांत दिलासी ।
कवेत घेऊनी कवटाळलेसी, तीर्थरूपी प्रसाद दिलासी ।। १ ।।

अन् म्हणालीस, ‘सनातन सनातन’ ।
म्हणतेस मग दूर का रहातेस ।
काय बोध घ्यावा मज काहीच कळेनासी ।
कारण मी आहे गे बालक अज्ञानी ।। २ ।।

महर्षींची गे तू कार्तिकपुत्री ।
आज्ञापालन त्यांचे त्वरित करसी ।
आज इथे तर उद्या तिथे ।
अविश्रांत गे तू वणवण फिरसी ।। ३ ।।

ना उन्हातान्हाची पर्वा ।
ना खाचखळग्यांची भीती ।
हे सगळे कशासाठी ।
केवळ या जगताच्या उद्धारासाठी ।। ४ ।।

ध्यानीमनी रात्रंदिनी घेऊनी एकच ध्यास ।
हिंदु राष्ट्र, हिंदु राष्ट्र, हिंदु राष्ट्र ।
गुरुकृपेने गे हे काव्य स्फुरले ।
अर्पण करते तव चरणांसी ।। ५ ।।

टीप – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ
– सौ. तेजा म्‍हार्दोळकर, म्‍हार्दोळ, गोवा.