Bengaluru Blast NIA : बेंगळुरू कॅफेमधील बाँबस्फोटामध्ये इस्लामिक स्टेटचा हात !  

  • एन्.आय.ए.च्या ७ राज्यांत १७ ठिकाणी धाडी

  • चेन्नईमध्ये ५ जणांना घेतले कह्यात !

बेंगळुरू (कर्नाटक) – येथील प्रसिद्ध रामेश्‍वरम् कॅफेमध्ये १ मार्च या दिवशी झालेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) ७ राज्यांत १७ ठिकाणी धाडी घातल्या. या प्रकरणात इस्लामिक स्टेटचा हात असल्याची माहिती समोर आली आहे.

१. एन्.आय.ए.ने बेंगळुरूच्या आर्.टी. नगर येथील इस्लामिक स्टेटशी संबंधित असणार्‍या टी. नझीर याच्या घरावर धाड टाकली. बाँबस्फोटासाठी नझीर यानेच चिथावणी दिल्याचा आरोप आहे.

२. एन्.आय.ए.ने यापूर्वी ग्रेनेड (हात बाँब) प्रकरणी आर्.टी. नगर आणि सुलतानपालिया येथे धाडी टाकल्या होत्या. येथून जिवंत काडसुते आणि ग्रेनेड जप्त करण्यात आले.

३. जुनैद नावाची व्यक्ती या बाँबस्फोटाचा मुख्य सूत्रधार असल्याचे समजते. पैशांच्या अफरातफरीच्या प्रकरणी कारागृहात आहे. एन्.आय.ए.ने कारागृहात जाऊन त्याची चौकशी केली आहे.

४. चेन्नई येथील रामनाथपूरम् येथील शमशुद्दीन नावाच्या व्यक्तीच्या घरावरही धाड घालण्यात आली. चेन्नईतील सिद्धरपेट आणि बिद्यार येथून ५ जणांना कह्यात घेण्यात आले आहे.