Amarnath Ghosh Murder : भरतनाट्यम् नर्तक अमरनाथ घोष यांची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या !

भरतनाट्यम् नर्तक अमरनाथ घोष

सेंट लुईस (अमेरिका) – कोलकाता येथील भरतनाट्यम् आणि कुचुपुडी नर्तक  अमरनाथ घोष यांची अमेरिकेतील सेंट लुईस, मिसूरी येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी यांनी ही माहिती दिली. घोष सेंट लुईस येथील वॉशिंग्टन विद्यापिठातून नृत्यात ‘मास्टर ऑफ फाइन आर्ट्स’चे शिक्षण घेत होते. घोष संध्याकाळी येथे फिरायला गेले असता अज्ञात आक्रमणकर्त्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.

देवोलिना भट्टाचार्जी यांनी अमरनाथ घोष यांच्या मृत्यूविषयी अमेरिकेतील भारतीय दूतावास, परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे साहाय्य मागितले आहे.

आम्ही तपासावर लक्ष ठेवून आहोत ! – शिकागोमधील भारतीय वाणिज्य दूतावास

अमेरिकेच्या शिकागो येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने अमरनाथ घोष यांच्या हत्येबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. या प्रकरणाच्या अन्वेषणावर आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि शक्य ती सर्व साहाय्य करत आहोत, असे आश्‍वासनही त्यांनी दिले.

संपादकीय भूमिका

  • खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या कथित हत्येच्या कटावरून भारतियावर आरोप करणारी अमेरिका स्वतःच्या देशात भारतियांच्या सातत्याने होणार्‍या हत्यांवर मात्र निष्क्रीय रहाते, हे लक्षात घ्या !
  • गेल्या काही महिन्यांत अमेरिकेत हिंदूंच्या हत्या सातत्याने होत आहेत. आता यावरून भारताने व्हाईट हाऊसला उत्तरदायी ठरवल्यास चूक ते काय ?
  • हिंदूंच्या या ‘टार्गेटेड किलिंग्ज’मागे (लक्ष्यित हिंसेमागे) पाकिस्तानी गुप्तचर संघटना आय.एस्.आय. आणि खलिस्तानी यांची भारतद्वेष्टी युती कार्यरत असण्याची शक्यता दाट आहे. भारताने आता अमेरिकेला या दिशेने अन्वेषण करण्यासाठी भाग पाडले पाहिजे !