‘एका बालसाधकाने नामजप लिहिलेली वही गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) दिली होती. ती वही सर्व साधकांना गंध घेण्यासाठी दिली. ती वही सुगंध घेण्यासाठी माझ्या मागे बसलेल्या साधिकेने मला देण्यापूर्वीच मला एक प्रकारचा सुगंध आला. तेव्हा मी मनात म्हटले, ‘सुगंध कसला येत आहे ?’ तेव्हाच मागे बसलेल्या साधिकेने ती वही माझ्या हातात दिली. ती वही हातात घेतल्यावर ‘त्या वहीतूनही तोच सुगंध येत आहे’, असे माझ्या लक्षात आले. ‘वहीला येणारा सुगंध कोणत्या प्रकारचा आहे ?’, हे मला ओळखता आले नाही. बर्याच साधकांना त्या वहीतून वेगवेगळ्या प्रकारचा सुगंध आला होता.’
– सौ. श्वेता शिवाजी सालेकर (वय ३७ वर्षे), खेड, रत्नागिरी.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |