Indian Navy Saved Merchant Ship : भारतीय युद्धनौकेने व्यापारी नौकेला वाचवले !

एडनच्या आखातातील व्यापारी नौकेवर ड्रोनद्वारे आक्रमण

नवी देहली – एडनच्या आखातात पुन्हा एकदा एका व्यापारी नौकेवर ड्रोनद्वारे  आक्रमण करण्यात आले. या वेळी भारतीय युद्धनौकेने व्यापारी नौकेला साहाय्य केले. हे आक्रमण कुणी केले, ते स्पष्ट झाले नाही.

१. या प्रकरणाची माहिती देतांना भारतीय सैन्याधिकार्‍यांनी सांगितले की, प्रशांत महासागरातील बेटांचा देश असलेल्या पलाऊ याचा ध्वज असलेल्या ‘एम्.व्ही. आयलँडर’ या नौकेवर २२ फेब्रुवारीला आक्रमण करण्यात आले. या वेळी नौकेतील कर्मचार्‍यांचा एक सदस्य घायाळ झाला. भारतीय नौदल पथक या नौकेवर चढले आणि तेथे उपस्थित असलेल्या कर्मचार्‍यांची सुटका केली.

२. भारतीय नौदलाचे प्रवक्ते कमांडर विवेक मधवाल म्हणाले की, भारतीय नौदलाच्या युद्धनौकांचे प्रयत्न व्यापारी नौका आणि खलाशी यांंच्या सुरक्षिततेसाठी भारतीय नौदलाच्या दृढ वचनबद्धतेची पुष्टी करतात. गेल्या काही आठवड्यांमध्ये, भारतीय नौदलाने पश्‍चिम हिंदी महासागरात झालेल्या आक्रमणानंतर अनेक व्यापारी नौकांना साहाय्य पुरवले आहे.