१५ ते २४.१०.२०२३ या कालावधीत नवरात्रीनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात दशमहाविद्या याग झाले. २०.१०.२०२३ या दिवशी गुरुकृपेने मला यज्ञाला उपस्थित रहाण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. यज्ञ झाल्यानंतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ देवीची आरती करत होत्या. त्या वेळी ‘दोन देवी माझ्यासमोर उभ्या असून मी त्यांची आरती करत आहे’, असे मला पूर्ण आरती होईपर्यंत जाणवत होते.
२. आरतीच्या तबकातील निरांजनात लावलेल्या ज्योतींचा प्रकाश पांढरा शुभ्र दिसणे
मला आरतीच्या तबकातील निरांजनात लावलेल्या ज्योतींचा प्रकाश पांढरा शुभ्र दिसला. मी त्या वेळी देवीजवळ लावलेल्या समईतील ज्योतीचा प्रकाश पाहिला, तर तो पिवळसर दिसत होता. ‘आरतीच्या तबकातील दिव्याचा प्रकाश पुष्कळ तेजोमय आहे’, असे मला जाणवले. त्याकडे पाहिल्यावर माझे मन शांत झाले.
३. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आरती करत असतांना मला त्यांच्या मस्तकावर लाल प्रकाश दिसला. ‘त्यांच्या मस्तकातून शक्ती प्रक्षेपित होत आहे’, असे मला वाटले. मला त्यांच्या मस्तकावर लाल प्रकाश पुष्कळ वेळ दिसत होता.
प.पू. गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळे मला हे अनुभवायला आले. ते त्यांच्याच चरणी अर्पण करते.’
– सौ. अंजली झरकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१.१०.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |