प्रार्थना करून आणि भाव ठेवून स्वयंपाक केल्याने पोळीवर ‘ॐ’ किंवा श्रीकृष्णासारखी आकृती उमटलेली दिसणे  

सौ. सुनीता गीते

‘प्रतिदिन स्वयंपाक करण्यास आरंभ करण्यापूर्वी मी प्रार्थना करते, तसेच पुढीलप्रमाणे भाव ठेवण्याचा प्रयत्न करते, ‘मी रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमातील अन्नपूर्णा कक्षात स्वयंपाक करत आहे. अन्नपूर्णामाता माझ्या माध्यमातून गुरुमाऊली, सर्व संत आणि आश्रमातील साधक यांच्यासाठी प्रसाद बनवत आहे. मी पू. रेखाताईंच्या (सनातनच्या ६० व्या संत पू. रेखा काणकोणकर (वय ४६ वर्षे) यांच्या) मार्गदर्शनाखाली महाप्रसाद बनवत आहे.’

मी पोळ्या करत असतांना ‘बाळकृष्ण ओट्यावर बसून माझ्याकडे बघत आहे’, असा भाव ठेवते. पोळी भाजल्यावर तिच्यावर नेहमी ‘ॐ’ किंवा श्रीकृष्णासारखी आकृती उमटलेली दिसते. ‘भगवान श्रीकृष्ण आणि प.पू. गुरुदेव हे सतत माझ्या समवेत आहेत’, असे वाटून मला आनंद अनुभवता येतो.’

– सौ. सुनीता गीते, गंगापूर रोड, नाशिक. (२०.७.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक