Sanatan Sanstha : सनातन संस्थेचा ‘हिंदुत्व के आधारस्तंभ’ पुरस्कार देऊन सन्मान !

डेहराडून (उत्तराखंड) येथे ‘वेदशास्त्र रिसर्च अँड फाउंडेशन’कडून हिंदुत्वाचे कार्य करणार्‍यांना ‘हिंदुत्व के आधारस्तंभ’ आणि ‘देवभूमी रत्न’ पुरस्कार प्रदान !

श्री. अभय वर्तक यांना पुरस्कार प्रदान करतांना भगतसिंह कोश्यारी

डेहराडून (उत्तराखंड), १५ फेब्रुवारी (वार्ता.) – ‘वेदशास्त्र रिसर्च अँड फाऊंडेशन’च्या अध्यक्षा आणि निमंत्रक डॉ. वैदेही ताम्हण यांनी डेहराडून येथील सांस्कृतिक विभागाच्या सभागृहात ‘देवभूमी रत्न’ पुरस्कार संमेलनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री, तसेच महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राज्याचे मंत्री सतपाल महाराज, राज्याचे माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत, श्री हरि चैतन्य पुरी महाराज, डॉ. उमाकानंद सरस्वती महाराज आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे उपस्थित होते. या वेळी ‘हिंदुत्व के आधारस्तंभ’ म्हणून कार्य करणार्‍यांना आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍यांना ‘देवभूमी रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. सनातन संस्थेला देण्यात आलेला ‘हिंदुत्व के आधारस्तंभ’ हा पुरस्कार संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनी स्वीकारला. या कार्यक्रमात डॉ. वैदेही ताम्हण यांनी लिहिलेल्या ‘27 सोल्स : स्पाईन चिलींग स्केरी स्टोरीज’ या इंग्रजी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

‘हिंदुत्व के आधारस्तंभ’ पुरस्कारप्राप्त व्यक्ती आणि संस्था यांची सूची

१. स्वामी श्री हरि चैतन्य महाराज
२. श्री. गोपाळ शेट्टी, खासदार, भाजप, मुंबई
३. गोलंदे महाराज
४. उद्बोध महाराज पैठणकर
५. श्री. अतुल जेसवानी
६. सनातन संस्था
७. गेली १०० वर्षे हिंदु धर्मग्रंथ प्रकाशन करणारी ‘गीता प्रेस’
८. धर्मांतरविरोधी कार्य करणारा ‘कुर्माग्राम आश्रम’ यांचे प्रतिनिधी
९. श्री. प्रदोष चव्हाणके, सुदर्शन

‘देवभूमी रत्न’ पुरस्कार प्राप्त व्यक्ती आणि संस्थांची नावे

१. सतपाल महाराज
२. ‘पद्मभूषण’ श्री. चंडी प्रसाद भट्ट,
३. स्वामी दिनेशानंद भारती
४. मधु भट्ट
५. कुसुम खंडवाल
६. उर्मी नेगी
७. डॉ. आशिष चौहान, आय.ए.एस्.
८. कर्नल डी.एस्. बर्तवाल
९. डॉ. यशवीर सिंह
१०. लेफ्टनंट जनरल जयवीर सिंह नेगी
११. ‘साधना’ टीव्ही

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक –

समाज आणि संस्कृती यांसाठी अतुलनीय योगदान देणार्‍यांचा सन्मान करणे, हा पुरस्कार देण्यामागील उद्देश ! – डॉ. वैदेही ताम्हण

डॉ. वैदेही ताम्हण

डॉ. वैदेही ताम्हण म्हणाल्या की, हे पुरस्कार अशा लोकांसाठी आहे ज्यांनी आपल्या समाज आणि संस्कृती यांसाठी अतुलनीय योगदान दिले आहे. त्यांचा सन्मान करणे हा यामागचा उद्देश आहे. ही देवभूमी उत्तराखंडच्या वारशाचे आणि हिंदुत्वाचे रक्षण करणार्‍यांची प्रशंसा आहे.

वेद शिकवण्यासाठी अनेक संस्थांची आवश्यकता ! – भगतसिंह कोश्यारी

भगतसिंह कोश्यारी

उत्तराखंडमध्ये एवढे मोठे पुरस्कार संमेलन आयोजित करणार्‍या वेदशास्त्र रिसर्च अँड फाऊंडेशन आणि डॉ. वैदेही ताम्हण यांचा मी आभारी आहे. मी त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करतो. देवभूमी रत्न पुरस्कार मिळालेले वेगवेगळ्या राज्यांतील असले, तरी त्यांची निवड करणे आणि त्यांना सन्मानित करणे, यासाठी तपशीलवार संशोधनाचीच आवश्यकता असते. माझी अपेक्षा आहे की, वेद शिकवण्यासाठी अशा आणखी संस्था असणे आवश्यक आहे.

‘वेदशास्त्र रिसर्च अँड फाऊंडेशन’चे कार्य वाखाण्याजोगे ! – उत्तराखंडचे पर्यटनमंत्री सतपाल महाराज

सतपाल महाराज

उत्तराखंडचे पर्यटनमंत्री सतपाल महाराज म्हणाले की, वेदशास्त्र रिसर्च अँड फाऊंडेशन वेदांच्या शिक्षणाला समर्पित आहे. वेदांचे ज्ञान हळूहळू लुप्त होत असतांना त्याची देखभाल आणि संवर्धन करण्यासाठी एक उत्कृष्ट कार्य केले जात आहे. या संस्थेचे कार्य वाखाण्याजोगे आहे.