अमरावती येथील नायब तहसीलदारांच्या घरातील चोरीचे प्रकरण
अमरावती – येथील राठी नगरात नायब तहसीलदार प्रशांत अडसुळे यांच्या घरी भरदिवसा चोरी झाली होती. पोलिसांनी या प्रकरणी ५ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडे देशी कट्टा आणि चाकू सापडले असून पोलिसांनी ते जप्त केले आहेत. घटनेतील मुख्य आरोपी हा नायब तहसीलदाराच्या घरीच चालक म्हणून काम करत होता. आरोपींनी जनगणनेच्या नावाखाली नायब तहसीलदारांच्या घरात घुसून लूट केली होती. आरोपींनी नायब तहसीलदाराच्या पत्नीचे हात-पाय बांधून बंदुकीच्या धाकावर ५ लाखांचे दागिने पळवले होते. पोलिसांनी ५ लाख ३० सहस्र रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या कारवाईसाठी पोलिसांनी ८ पथके तैनात केली होती, तसेच १०० सीसीटीव्ही कॅमेरे पडताळले.
संपादकीय भूमिका :नायब तहसीलदारच असुरक्षित असतील, तर सर्वसामान्य नागरिकांची काय व्यथा ? |