तरुणीची छेड काढणार्‍या तरुणाला स्थानिकांकडून चोप !

प्रतिकात्मक चित्र

डोंबिवली – येथे भर रस्त्यात रात्री ११ वाजता कामावरून घरी परतणार्‍या तरुणीचा चेहरा पकडून तिच्याशी लगट करून तिची छेड काढणार्‍या प्रीतम गायकवाड या सेवानिवृत्त पोलीस अधिकार्‍याच्या मुलाला स्थानिक मुलांनी चोप देऊन पोलिसांच्या कह्यात दिले.

या तरुणाने मुलीचा गळा पकडत तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केल्यावर तिने प्रतिकार करत आरडाओरडा चालू केला. त्या वेळी स्थानिक तरुण तिच्या साहाय्याला धावून आले. ही मुलगी आजदेपाडा परिसरात रहाते. मरोळ, अंधेरी येथे रहाणारा प्रीतम हा तरुण येथे त्याच्या नातेवाइकांकडे आला होता. माऊली बंगल्याच्या परिसरात हा प्रकार घडला.

संपादकीय भूमिका :

स्त्रियांसाठी सुरक्षित समाज निर्माण होण्यासाठी रामराज्यच हवे !