केरळमध्ये अल्पवयीन नातीवर बलात्कार करणार्‍या मुसलमानाला १११ वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

प्रतिकात्मक छायाचित्र

थिरूवनंतपूरम् (केरळ) – नादापूरम् विशेष जलद गती न्यायालयाने डिसेंबर २०२१ मध्ये अल्पवयीन नातीवर बलात्कार करणारा तिचा ६२ वर्षीय आजोबा व्हेट्रोमल्ला अब्दुल याला एकूण १११ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या अंतर्गत त्याचा कारावास भोगण्याचा अवधी वेगवेगळा आहे; मात्र कारावासाची शिक्षा एकत्र भोगावी लागणार असल्याने त्याला ३० वर्षे कारावास भोगावा लागणार आहे. अब्दुल याला २ लाख १० सहस्र रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. इयत्ता चौथीमध्ये शिकणारी मुलगी नाताळाच्या सुट्टीत आजोबा अब्दुल याला भेटायला आली असतांना घरात कुणी नसतांना त्याने तिच्यावर  बलात्कार केला होता. अब्दुल याने, ‘झालेला प्रकार कुणालाही सांगायचा नाही’, अशी तिला धमकी दिली होता. ही घटना मुलीने शाळेतील मैत्रिणीला सांगितल्यानंतर ती उघड झाली.

मल्लपूरम् येथे स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कारासाठी मुसलमानाला झाली होती १५० वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

काही दिवसांपूर्वीच केरळच्या मल्लपूरम् भागातील एका ४२ वर्षीय मुसलमान व्यक्तीला स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी १५० वर्षांची एकत्रित शिक्षा सुनावण्यात आली होती. हा गुन्हा वर्ष २०२२ मध्ये झाला होता. त्याने त्याच्या ३ पत्नींपैकी एकीच्या पोटी जन्मलेल्या सर्वांत लहान अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप होता.

संपादकीय भूमिका

  • ‘अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार भर चौकात बांधून त्याच्यावर दगड मारून त्याला ठार करण्याची शिक्षा करा’, अशी कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !