अध्यात्माच्या संदर्भातील ग्रंथांचे  केवळ पारायण करू नये; तर वाचन कृतीत आणणे महत्त्वाचे !

 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘अनेकजण अध्यात्माच्या संदर्भातील ग्रंथांचे वाचन करतात. काहीजण त्यांचा मोठेपणा म्हणून ‘मी हा ग्रंथ … इतके वेळा वाचला’, असेही सांगतात. प्रत्यक्षात अध्यात्म हे कृतीत आणणे महत्त्वाचे असते, उदा. पोहायचे कसे, याची कितीही माहिती वाचली, तरी प्रत्यक्षात पाण्यात उतरल्याशिवाय पोहणे शिकता येत नाही. त्याचप्रमाणे अध्यात्म कृतीत आणल्यावरच ते खरे आत्मसात होते. त्यामुळे त्याचे केवळ पठण वा पारायण करू नये.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२८.१.२०२४)