Uttarakhand UCC : विधानसभेच्या येत्या अधिवेशनात समान नागरी कायद्यासाठी विधेयक सादर करणार !

उत्तरखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांचे विधान !

उत्तरखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी

डेहराडून (उत्तराखंड) –  समान नागरी संहितेचे प्रारूप सिद्ध करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली समिती २ फेब्रुवारी या दिवशी राज्य सरकारला प्रारूप सादर करील आणि आम्ही आगामी विधानसभा अधिवेशनात विधेयक आणून राज्यात समान नागरी संहिता लागू करू, असे विधान राज्याचे मुख्यमंत्री पुष्कारसिंह धामी यांनी केले.

मुख्यमंत्री धामी पुढे म्हणाले की, ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’चे ध्येय आणि ठराव निवडणुकीपूर्वी राज्यातील जनतेसमोर ठेवण्यात आले होते. त्यांच्या संकल्प आणि आकांक्षा यांना अनुसरून आमचे सरकार राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील.

समान नागरी संहितेसाठी स्थापन करण्यात आलेल्या तज्ञ समितीचा कार्यकाळ चौथ्यांदा वाढवण्यात आला आहे. २७ मे २०२२ या दिवशी निवृत्त न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समान नागरी संहितेच्या निर्मितीसाठी समिती स्थापन करण्यात आली. यानंतर समितीचा कार्यकाळ ३ वेळा वाढवण्यात आला.