आव्हाड यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची भाजपची मागणी !

जितेंद्र आव्हाड

सातारा, ५ जानेवारी (वार्ता.) – जितेंद्र आव्हाड यांनी प्रभु श्रीराम यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह व्यक्तव्याविषयी त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी येथील भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली. याविषयी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांना लेखी तक्रार देण्यात आली आहे.