धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई !
धुळे – संमत झालेल्या गट विम्याच्या देयकाची रक्कम शिंदखेडा उपकोषागार कार्यालयात पाठवण्यासाठी लाच मागणार्या दोंडाईचा येथील मुख्याध्यापिका अर्चना बापुराव जगताप यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. दोंडाईचा येथील एका सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षकाच्या संमत झालेल्या गट विम्याच्या देयकाची १ लाख ३३ सहस्र ४८४ रुपयांची रक्कम मिळण्यासाठी त्यांनी शासकीय आश्रम शाळा, अक्कलकोस येथील मुख्याध्यापिकेकडे रितसर अर्ज केला; पण काम न झाल्याने त्यांनी मुख्याध्यापिकेकडे तगादा लावला. तेव्हा जगताप यांनी त्यांच्याकडे ५ सहस्र रुपयांची लाच मागितली.
संपादकीय भूमिका :लाचखोर मुख्याध्यापिकेच्या शाळेतील विद्यार्थीही भविष्यात भ्रष्टाचारी निपजले, तर आश्चर्य ते काय ? |