रत्नागिरी जिल्ह्यात ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ सव्वा लाखांहून अधिक नागरिकांनी घेतला सहभाग

रत्नागिरी – जिल्ह्यामध्ये भारत संकल्प यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळत असून, जिल्ह्यातील ५७३ ग्रामपंचायतींमध्ये ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत भारत संकल्प यात्रा पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील १० शहरी भागांतही भारत संकल्प यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ग्रामीण भागांतील १ लाख २५ सहस्र १५७  नागरिकांनी, तर शहरी भागांत २ सहस्र ९२५ असे एकूण १ लाख २८ सहस्र ८५२ लोकांनी या संकल्प यात्रेत सहभाग नोंदवला. ग्रामीण भागांमधील यात्रेमध्ये ८४ सहस्र ५७५ जणांनी, तर शहरी भागांमध्ये १ सहस्र ९८२ जणांनी सहभाग घेतला.

राजापूर तालुक्यातील ६० ग्रामपंचायती, लांजा ५८, रत्नागिरी ७०, संगमेश्वर ७२, चिपळूण ७६, दापोली ५७, गुहागर ६५, खेड ६६ आणि मंडणगड तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये भारत संकल्प यात्रा पूर्ण झाली आहे.

ग्रामीण भागांत भारत संकल्प यात्रेमध्ये १ सहस्र १०३ जणांना सुरक्षा बीमा, १ सहस्र ०८० जणांना जीवन ज्योती योजना लाभ, ६८ सहस्र ८०४ जणांचे आरोग्य तपासणी, ६२ सहस्र ६७३ जणांचे क्षयरोग तपासणी, १ सहस्र ००४ जणांना सिकल सेल (पेशी रक्तक्षय), ८९० जणांनी उज्ज्वला गॅस योजना अंतर्गत नाव नोंदणी, ६ सहस्र ५८४ महिला, ४ सहस्र १७८ मुले, १ सहस्र १३८ खेळाडू, ४८९ स्थानिक कलाकारांना गौरवण्यात आले. ४२७ जणांना ‘सॉईल हेल्थ कार्ड’ प्रात्याक्षिक, तर २७७ जणांना ड्रोन प्रात्याक्षिक दाखवण्यात आले. ‘माय भारत व्हॉलंटीअर’ म्हणून ९२१ जणांची नोंदणी, तर २८७ जणांना ‘किसान क्रेडीट कार्ड’चा लाभ देण्यात आला. ७८ सहस्र ३५५ जणांना ‘आयुष्यमान भारत कार्ड’ जारी करण्यात आले. तसेच ५ सहस्र ५३२ लाभार्थ्यांना ‘मेरी कहानी मेरी जुबानी’ अंतर्गत लाभ देण्यात आला.