नरिमन पॉईंट येथे २५० चारचाकींसाठी मोठे वाहनतळ सिद्ध होणार !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – नरिमन पॉईंट येथे २५० चारचाकी मावतील, असा मोठे वाहनतळ सिद्ध होणार आहे. यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने निविदा काढली आहे. याद्वारे एम्.एम्.आर्.डी.ए.ला मासिक किमान साडे ८ लाख रुपयांचा महसूल मिळणार आहे. येथे ११ माळ्यांची इमारत उभी करण्यात आली असून त्यातील तीन मजले व्यावसायिक उपयोगासाठीचे आहेत. उर्वरित आठ माळ्यांवर वाहनतळासाठीची जागा आहे. येथे वाहने उभी करण्याची क्षमता ५०० इतकी आहे.

तिसर्‍या आणि चौथ्या मजल्यावर प्रत्येकी ५७, पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर प्रत्येकी ६६ आणि सातव्या मजल्यावर चार वाहने उभी करण्याची जागा असेल. वाहनतळाची जागा अत्याधुनिक उद्वाहन यंत्र, सरकते जिने, पाच वातानुकूलित चित्रपटगृहे, १९ दुकाने आणि फूड कोर्ट यांनी सुसज्ज आहे.