गोशाळा, निसर्गाेचार केंद्र, वनऔषधी निर्मिती आणि अन्य प्रकल्प होणार !

सोमेश्वर शांतीपिठाच्या वतीने ४ जानेवारीला होणार भूमीपूजन

पत्रकार परिषद

रत्नागिरी – सोमेश्वर शांतीपिठाच्या वतीने येत्या ४ जानेवारीला दुपारी ४ वाजता सोमेश्वर येथील श्री. शशिकांत सोहनी यांनी दान केलेल्या ५ एकर जागेमध्ये भूमीपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमेश्वर शांतीपिठाकडून भविष्यात गोशाळा, योगाश्रम, निसर्गोपचार केंद्र, वनऔषधी निर्मिती, बाल संस्कार केंद्र, फळ प्रक्रिया उद्योग केंद्र आणि वृद्धाश्रम अशा विविध विषयाला अनुसरून या भूमीत प्रकल्प करण्यात येणार आहे.

१ जानेवारी या दिवशी सोमेश्वर शांतीपीठ रत्नागिरी, सोमेश्वर विश्व मंगल गोशाळा आणि गोविज्ञान केंद्र सोमेश्वर शांतीपिठाच्या वतीने येथील शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

या वेळी श्री. राजेश आयरे, श्री. संतोष पावरी, श्री. रवींद्र इनामदार, अनुजाताई पेटकर, विनोद पेटकर, देवेंद्र झापडेकर, छाया अनावकर, राकेश वाघ, संजय जोशी आणि सोमेश्वर ट्रस्टचे सगळे सदस्य उपस्थित होते .

या पत्रकार परिषदेत येथील तमाम समाजाला नम्र विनंती करण्यात आली आहे की, त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे आणि या कार्यक्रमांमध्ये स्वत:चेही योगदान द्यावे. श्री. संतोष पावरी यांनी ‘विश्व मंगल गोशाळेच्या माध्यमातून गोवंश, गोवंशियांचे रक्षण, गोआधारित कृषी व्यवस्था, कृषी आधारित अर्थनीती स्वास्थ्य नीती आणि ऊर्जा नीती या माध्यमातून या गोशाळेकडून गो विज्ञानाचे काम करण्यात येणार आहे’, असे पत्रकारांना सूचित केले. श्री. रवींद्र इनामदार यांनी ‘भविष्यामध्ये हा प्रकल्प फार मोठी कामगिरी करणार आहे’, असे सांगितले.