RJD MLA On Temple : (म्हणे) ‘मंदिर म्हणजे मानसिक गुलामगिरीचा मार्ग !’  – राष्ट्रीय जनता दलाचे आमदार फतेह बहादुर सिंह

बिहारमधील सत्ताधारी राष्ट्रीय जनता दलाचे आमदार फतेह बहादुर सिंह यांनी लावला फलक !

पाटलीपुत्र (बिहार) – बिहारमधील सत्ताधारी राष्ट्रीय जनता दलाचे आमदार फतेह बहादुर सिंह यांनी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री लालुप्रसाद यादव आणि त्यांच्या पत्नी राबडी देवी यांच्या घराबाहेर सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त फलक लावला आहे. यात श्रीराममंदिराच्या उद्घाटनावरून अप्रत्यक्ष टीका करतांना ‘मंदिर म्हणजे मानसिक गुलामगिरीचा मार्ग आहे’, अशा प्रकारचे लिखाण लिहिण्यात आले आहे. तसेच या फलकावर लालुप्रसाद यादव, राबडी देवी, त्यांचे पुत्र आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची छायाचित्रे आहेत. याखेरीज भगवान बुद्ध, सम्राट अशोक यांची चित्रे आणि सावित्रीबाई फुले अन् अन्य लोकांची छायाचित्रे आहेत.

या फलकावर लिहिले आहे की, मंदिराचा अर्थ म्हणजे मानसिक गुलामगिरीचा मार्ग आहे आणि शाळेचा अर्थ आहे जीनवातील प्रकाशाचा मार्ग. मंदिरामध्ये घंटा वाजते, तेव्हा आम्हाला संदेश मिळतो की, आम्ही अंधश्रद्धा, पाखंड, मूर्खता, अज्ञान यांच्याकडे वाटचाल करत आहोत. जेव्हा शाळेची घंटा वाजते, तेव्हा हा संदेश मिळतो की, आम्ही सर्वगुण ज्ञान आणि वैज्ञानिक प्रकाश यांच्याकडे वाटचाल करत आहोत. आता तुम्हाला ठरवायचे आहे की, तुम्हाला कोणत्या दिशेने जायचे आहे.

संपादकीय भूमिका

मंदिरांचे महत्त्व न समजणारेच नाही, तर मंदिरांचा द्वेष करणारेही अशा प्रकारची विधाने करतात ! अशांवर सरकारांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने ते परत परत अशी विधाने करत हिंदु धर्माचा अवमान करत रहातात ! ही स्थिती हिंदु राष्ट्रात पालटण्यात येईल !