संपूर्ण सृष्टी ही पंचमहाभूतांनी बनलेली आहे. त्यामुळे पृथ्वीवरील प्रत्येक घटकांमधेही पंचमहाभूतांचे वेगवेगळे प्रमाण आपल्याला आढळते. संगीतातील विविध घटक, उदा. श्रृती, स्वर, राग इत्यादींमध्येही या पंचमहाभूतांचे प्रमाण वेगवेगळे आहे. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सूक्ष्म अभ्यासातून ‘संगीत आणि वाद्य यांच्या नादांमध्ये पंचमहाभूतांचे प्रमाण कसे आहे ?’ हे खालील सारणीत दिले आहे.
खालील सारणीवरून हा भाग लक्षात येतो की, सूक्ष्म नाद असलेल्या श्रृतींमध्ये आकाशतत्त्वच अधिक प्रमाणात आहे. संगीतातील शब्द आणि भावना जशा वाढत जातात, तसा तो नाद जडत्वाकडे अधिक जातो आणि ज्या नादामध्ये रज-तम गुणांचा भाग वाढलेला असतो, त्यामध्ये जडत्वदर्शक पृथ्वीतत्त्वाचे प्रमाण अधिक जाणवायला लागते.
(टीप – तराना, होरी, कजरी हे भारतीय शास्त्रीय संगीतातील प्रकार आहेत. शास्त्रीय संगीतात स्वर अधिक आळवले जातात. त्यात शब्दांना पुष्कळ महत्त्व नसते, तर उपशास्त्रीय संगीतात, उदा. होरी, कजरी इत्यादी शब्दांसहित स्वर गायले जातात. यात शब्दांनाही महत्त्व असते. यातील तराना या प्रकारामध्ये ‘नोम’ ‘तोम’, ‘नादीर दीर’ असे शब्द स्वरांसहित गायले जातात.)
– सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (८.७.२०२३)
|