देवाची शक्ती आणि चैतन्य यांचा लाभ आध्यात्मिक स्तरावर होऊन प्रगती होणे महत्त्वाचे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कु. सुषमा लांडे : मी देवद आश्रमात अन्नपूर्णा कक्षात (स्वयंपाकघरात) सेवा करते. तेथील श्री अन्नपूर्णादेवीची मूर्ती पहिल्यापेक्षा अधिक चमकतांना दिसत असून तिच्यातील तेजही वाढले आहे. मी स्वयंपाकघरात सेवेला जाण्यापूर्वी माझ्या मनामध्ये अनेक नकारात्मक विचार, निराशा आणि मरगळ असते; परंतु स्वयंपाकघरात गेल्यावर श्री अन्नपूर्णादेवीच्या कृपेमुळे माझे नकारात्मक विचार, निराशा आणि मरगळ कधी दूर होते, हे मलाच कळत नाही. मला सेवेशी एकरूप होऊन सेवा आनंदाने करता येते.

कु. सुषमा लांडे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : तू तुझे हे विचार कुणाशी बोलून घेतेस का ? तू मनातील विचार कुणाशी तरी बोलून घेत जा, म्हणजे तुला देवीची शक्ती आणि चैतन्य यांचा लाभ आध्यात्मिक स्तरावर होईल अन् तुझी प्रगती होईल. आपण शारीरिक त्रासासाठी औषधोपचार घेतो. मानसिक त्रासासाठी उत्तरदायी साधकांचे साहाय्य घेऊन त्यांच्याकडून आपल्या मनातील विचारांना योग्य ती सकारात्मक दिशा घेतो, तसेच स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवून स्वयंसूचना देतो.

देवाकडे आपल्या प्रगतीसाठी आशीर्वाद मागायचा आणि  प्रयत्नही करायचे. देवतांची शक्ती आध्यात्मिक उन्नतीसाठी वापरायला हवी.

– कु. सुषमा लांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.