मंदिराच्या भूमीवर ‘कॉफी हाऊस’ बांधले !
कराची (पाकिस्तान) – पाकिस्तानमध्ये एकामागून एक हिंदु मंदिरांना लक्ष्य केले जात आहे. पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमधील प्राचीन शारदापीठ मंदिर पाडले. मंदिराची भूमी बळकावून त्यावर ‘कॉफी हाऊस’ बांधण्यात आले आहे. पाकच्या सर्वोच्च न्यायालयाने या मंदिराचे संरक्षण करण्याचा आदेश देऊनही पाकने तो धुडकावून लावत मंदिर पाडले. हे प्राचीन मंदिर ‘यूनेस्को’च्या संवर्धनसूचीत अंतर्भूत होते.
पाकिस्तानच्या सिंध प्रांतात नुकतेच श्री हिंगलाजमाता मंदिर उद्ध्वस्त करण्यात आले होते. श्री हिंगलाजमाता मंदिरही ‘यूनेस्को’च्या संवर्धनसूचीत अंतर्भूत होते. याआधीही जुलै २०२३ मध्ये कराचीतील श्री मरीमातेचे मंदिर पाडण्यात आले होते.
Disturbing visuals from Sharda peeth PoK 😡 Disheartened to see the peripheral wall of our Sharda sarvagnya peeth across LoC in Distt.Neelum broken and stones thereof carted away. Further there are some more encroachments going on. Revealed by our civil society members across LoC… pic.twitter.com/MeVtl8AjVW
— Ravinder Pandita(Save Sharda) (@panditaAPMCC63) November 21, 2023
संपादकीय भूमिकायाविषयी केंद्र सरकारने १०० कोटी हिंदूंच्या वतीने पाकला जाब विचारून ती भूमी वाचवावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे ! |