हिंदूंच्या धर्मांतराचे षड्यंत्र उघड !
बेंगळुरू – कर्नाटकातील दावणगिरे येथील ख्रिस्ती मिशनर्यांकडून चालवल्या जाणार्या डॉन बॉस्को शाळेत हिंदु मुलांना गोमांस खायला दिले जात होते, अशी धक्कादायक माहिती ‘राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा’चे (‘एस्.सी.पी.सी.आर्’चे) अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की,
१. शाळेत मुलांना पुरवण्यात येणार्या अन्नपदार्थांच्या नावांमध्ये गोमांसाचाही समावेश असल्याचे आढळून आले.
२. ‘एस्.सी.पी.सी.आर्’च्या अन्वेषण पथकाला वसतीगृहाच्या स्वयंपाकघरात गोमांस आणि ते खरेदी केल्याचे देयक सापडले.
३. या मिशनरी शाळेच्या वसतीगृहामध्ये मोठ्या संख्येने हिंदु मुले आहेत, तरीही सर्व मुलांना ख्रिस्ती पंथानुसार आचरण करण्यास भाग पाडले जात आहे. तेथे गोमांस शिजवले जाते. या प्रकरणी आवश्यक कारवाईसाठी शाळेच्या व्यवस्थापनाला नोटीस पाठवण्यात आली आहे.
४. ‘वसतीगृहातील महिलांनी आम्हाला ख्रिस्ती पंथानुसार शिक्षण दिले’, असा आरोप वसतीगृहातील मुलांनी केला आहे. मिशनरी शाळा पैशांच्या लोभापोटी मुलांना त्यांच्या इच्छेविरुद्ध वसतीगृहात ठेवतात, तसेच त्यांना त्यांच्या कुटुंबापासून दूर ठेवतात. हे सर्व स्थानिक अधिकार्यांच्या संगनमताने केले जाते.
संपादकीय भूमिकाशिक्षणाच्या नावाखाली धर्मांतराच्या कुकृत्यांमध्ये गुंतलेल्या ख्रिस्ती मिशनरी शाळांवर आता देशात बंदीच आणली पाहिजे ! |