पाकमधील ईशनिंदा कायदा ख्रिस्तीविरोधी असल्याचा आरोप !
वॉशिंग्टन (अमेरिका) – भारतविरोधी इल्हान उमर यांच्यासह ११ अमेरिकी खासदारांनी पाकिस्तानला दिले जाणारे अमेरिकी अर्थसाहाय्य रोखण्याची मागणी केली. जोपर्यंत पाकमध्ये लोकशाही व्यवस्था पुनर्स्थापित होत नाही, तसेच स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत पाकला साहाय्य करण्यात येऊ नये, असे या खासदारांचे म्हणणे आहे.
खासदारांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री एंटनी ब्लिंकन यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की,
१. परराष्ट्र मंत्रालयाने याचा अभ्यास करावा की, पाकला मिळालेल्या अमेरिकी साहाय्याचा वापर मानवाधिकारांच्या उल्लंघनासाठी तर होत नाही ना ?
२. पाक सरकारने ईशनिंदा कायदा अधिक कठोर केल्याने तेथील धार्मिक समूह आणि अल्पसंख्यांक यांच्यावर अधिक नियंत्रण आणण्यात आले आहे. पाकिस्तानी संसदेत संबंधित विधेयक संमत झाल्यानंतर ८ दिवसांच्या आतच तेथील विविध चर्चवर लोकांनी आक्रमणे केली होती. जारनवाला येथील ख्रिस्त्यांच्या घरांना आग लावण्यात आली होती. जर हे विधेयक कायद्यात रूपांतरित झाले, तर भविष्यात धर्म आणि विश्वास यांच्या स्वातंत्र्यावर गदा येईल.
३. वर्ष १९८७ पासून मे २०२३ या कालावधीत २ सहस्र लोकांवर ईशनिंदा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे ८८ लोकांची सामूहिक हत्या करण्यात आली, अशी माहिती ‘सेंटर फॉर सोशल जस्टिस’ने दिली आहे.
संपादकीय भूमिकाभारतातील किती हिंदु लोकप्रतिनिधी पाक आणि बांगलादेश येथे होणार्या हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवतात ? |