३ जण घायाळ
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील हिंदु पत्रकार सुगाता बोस यांच्या फरीदपूरमधील मधुखली गावामधील घरावर अज्ञातांनी धारधार शस्त्रांद्वारे आक्रमण केले. या आक्रमणामध्ये सुगाता बोस यांची आई सौ. काकुली बोस, त्यांचे वडील आणि स्वातंत्र्यसैनिक श्यामलेंदू बोस अन् अन्य १ जण घायाळ झाले आहेत. या सर्वांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार श्यामलेंदू बोस यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्या डोक्याला मार लागला असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपी एकच होता की, त्याच्या समवेत आणखी काही जण होते, तसेच आक्रमणाचा उद्देश काय होता, हेही समजू शकलेले नाही. सुगाता बोस हे बांगलादेशातील बंगाली वृत्तपत्र ‘अजकेर पत्रिका’मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत.