पुरातत्व विभागाकडून राज्य सरकारला नोटीस !
विजयनगर (कर्नाटक) – येथील ऐतिहासिक विरूपाक्ष मंदिरात राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी मंदिराच्या एका खांबाला खिळे ठोकण्यासाठी भोके पाडण्यात आली. हे मंदिर पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या नियंत्रणात असून त्यांच्या अनुमतीविना येथे काहीही पालट करता येते नाही. खांबाला भोके पाडल्याच्या घटनेवरून पुरातत्व विभागाने राज्य सरकारला नोटीस बजावून यावर उत्तर मागितले आहे. २ नोव्हेंबरला झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी ही घटना घडली होती.